Pune News : अकरा भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

एमपीसी न्यूज – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जुलै रोजी देशभरात ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु, तमिळ, पंजाबी, बंगाली, ओडिया आणि मल्याळम् या 11 भाषांमध्ये 23 जुलैला ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

या महोत्सवात श्रीगुरुपूजन, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संग्रहित भाग, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके (बचाव आणि आक्रमण), आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता (चलचित्र), तसेच आत्पकाळात हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना याविषयी वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.

गुरु म्हणजे काय, गुरुंचे जीवनातील महत्त्व, गुरुकृपा कार्य कशी करते, त्यासाठीचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. सध्याच्या महामारीच्या आपत्काळात दैवी बळाची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे या महोत्सवात सहभागी होण्याने गुरूंचा आशीर्वाद लाभेल, तसेच हिंदूंचे धार्मिक संघटनही होईल. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ करून घ्यावा, तसेच आपले मित्र-परिवार, परिचित, नातेवाईक यांनाही याचे निमंत्रण द्यावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठी भाषेतील ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता होणार असून तो ‘यू-ट्यूब’वर पहाता येईल. त्याच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :

– http://Youtube.com/SanatanSanstha

– http://www.sanatan.org/mr/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.