Pune news: डॉ. अंजली साबणे यांच्याकडील कार्यभार काढून घ्या – गणेश बिडकर

सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक गणेश बिडकर यांचा स्थायी समितीला प्रस्ताव

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे या त्यांच्या पदाला न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडील कार्यभार काढून घेण्यात यावा. हा कार्यभार विभागून देण्यात यावा, असा प्रस्ताव भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी स्थायी समितीला शुक्रवारी ( दि. 4 सप्टेंबर) दिला आहे. त्यावर येत्या मंगळवारी ( दिनांक 8 सप्टेंबर ) होणाऱ्या समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. 

पुणे शहरातील कोविड 19 महामारी सुरू असल्याने महापालिकेच्या आरोग्य कार्यालयातील गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पत्रकार, माजी महापौर यांच्या निधनानंतर पुणे शहरातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, जम्बो कोविडमधील अपुऱ्या सोयीसुविधा, अंशदायी योजनेतील सध्या उडालेला गोंधळ, रुग्णांना उपलब्ध बेडची माहितीतील अनियमितता आहे. याबाबत डॉ. अंजली साबणे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधल्यास फोन न घेणे, 2 – 2 दिवस फोनला उत्तरही देत नाहीत, त्या या पदाला न्याय देऊ शकत नाहीत, त्यांचे सभासद आणि अधिकारी यांच्याशी संपर्क असलेला तुटलेला दिसत आहे. याचे गंभीर परिणाम शहरतील नागरिकांना भोगावे लागत आहे.

त्यामुळे पुणे महापालिकेची प्रतिमा नागरिकांमध्ये दिवसेंदिवस खराब होताना दिसत आहे. याबाबतीत योग्य ती चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. त्यांच्याकडील कार्यभार काढून घेण्यात यावा. हा कार्यभार विभागून देण्यात यावा, असे आदेश देण्यात यावे, असा प्रस्ताव सत्ताधारी पक्षचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी स्थायी समितीला दिला आहे. त्यावर अनुमोदक म्हणून सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आणि नगरसेविका वर्षा तपकिर यांच्या सह्या आहेत. येत्या मंगळवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत त्यावर काय निर्णय होणार, याची उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.