Pune News: दिरंगाईमुळे पुणेकरांच्या माथी 800 कोटींचा भुर्दंड

एमपीसी न्यूज: मुळा-मुठा नद्याच्या शुध्दीकरणासाठी महापालिकेकडून राबविण्यात येणार्‍या मलनिस्सारण प्रकल्प (जायका) प्रकल्पासाठी 14 टक्के जदा दराने निवीदा आली आहे. त्यामुळे प्रकल्पा होत असलेल्या दिरंगाईचा फटका महापालिकेला बसणार असून पुणेकरांच्या माथी 800 कोटीचा बोजा पडणार आहे.

नदी सुधार योजने अंतर्गत मुळा-मुठा नदींमध्ये मिसळणारे मैलापाणी शुद्ध करण्यासाठी जपान येथील ‘जायका’ कंपनीच्या मदतीने मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प व मैलापाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. हा प्रकल्पाला 2016 मधे केंद्राने मंजूरी दिली तेव्हा हा प्रकल्प 900 कोटींचा होता. तर त्याच्या निविदा महापालिकेने 2021 मध्ये काढल्या तो पर्यंत या प्रकल्पाची किंमत तब्बल 1500 कोटींवर गेली होती.

महापालिकेने या प्रकल्पासाठी निविदा मागविल्या होत्या त्या सहा कंपन्या आल्या होत्या. मात्र, जायकाच्या नियमानुसार, एकच कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने वस्तु सेवा कराच्या (जीएसटी) अतिरिक्त 2 टक्क्यांसह 14 टक्के जादा दराने निविदा भरली आहे. या प्रकल्पाच्या सल्लागारासह संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘व्हीडीओ शुटिंग’ करून ही निविदा उघडण्यात आली आहे.ही निविदा मंजूर झाल्यास तब्बल 1700 कोटींवर या योजनेचा खर्च जाणार आहे. तर या प्रकल्पासाठी जपान मधील जायका कंपनीकडून केवळ 850 कोटींचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा उर्वरीत खर्च आता महापालिकेच्या माध्यमातून पुणेकरांना सोसावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.