Pune News : परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरदार व ऑलिंपिक खेळाडूंसाठी विशेष लसीकरण मोहीम

एमपीसी न्यूज – परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, रोजगारासाठी जणारे व टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी खेळाडूंसाठी पुणे पालिकेच्या वतीने उद्या बुधवारपासून विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरणाचा दुसरा डोस (28 दिवसानंतर व 84 दिवसांपूर्वी) आणि पहिला डोस बाकी असणाऱ्या नागरिकांना या मोहीमेअंतर्गत लस देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिकेमार्फत बुधवारी 16 जून ते शुक्रवारी 18 जून या कालावधीत ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी परदेशी विद्यापीठातील/महाविद्यालयातील प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, पारपत्र (पासपोर्ट), व्हिसा, तसेच विद्यापीठ/महाविद्यालयाकडून प्राप्त झालेले I -20 किंवा DS – 160 Form (Admission Confirmation letter and I-20 or DS-160Form for Foreign Visa from Concerned overseas university etc.) वर्क परमीट, संबंधित कंपनीचे ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे [email protected] या ईमेल वर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे मनपा प्रशासनाकडून कागदपत्राची छाननी करून इमेलद्वारे टोकन देण्यात येईल‌. त्यानंतर विहित वेळेनुसार लसीकरणासाठी पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील पाचव्या मजल्यावरील लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते 5 या वेळेत संपूर्ण कागदपत्रासह उपस्थित राहता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.