Pune News : EPFO तर्फे कामगार दिनानिमित विशेष वेबिनार!

एमपीसी न्यूज :  आंतरराष्ट्रीय कामगार दिन (Pune News) व महाराष्ट्र दिनानिमित पुण्यातील रिजनल पीएफ ऑफिस यांच्याद्वारे 1 मे रोजी विशेष वेबिनार आयोजीत करण्यात आले. या वेबिनारमध्ये पीएफ ऑफिसमधील सदस्य आणि नियोक्ते ऑनलाइन माध्यमातून जोडले गेले होते.

ज्यांच्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या विविध उपक्रम जसे की डिजिटल स्वाक्षरी आणि ई – स्वाक्षरीची प्रक्रिया, हाइयर वेज पेंशन, प्रयास पेंशन योजना, ई नामांकन, केवायसी प्रक्रिया, मुख्य नियोक्ता पोर्टल, सदस्यांच्या नाव दुरुस्तीची प्रक्रिया इत्यादींवर चर्चा करण्यात आली.

Mumbai News : रजनीश कर्नाटक यांची बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

या वेबिनारचे मनोज माने, क्षेत्रीय भविषय निधी आयुक्त II यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यालयीन कर्मचा-यांच्या टिमने आयोजन केले. वेबिनार दरम्यान पेंशन, विशेषतः प्रयास पेंशन आणि हाइयर पेंशनशी संबंधित माहिती देण्यात आली.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त रिजनल पीएफ़ कार्यालयतर्फे विशेष चर्चासत्रात P.F. सदस्यांना सायवर सुरक्षेबाबत जागरूक करण्यात आले. पीएफ़ सदस्यानेआपला आयडी आणि पासवर्ड (Pune News) सुरक्षित ठेवावा आणि ओटीपी कोणशीही शेअर करू नये. मनोज माने, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त – II यांनी आंतरराष्ट्रीय कामगारदिनानिमित्त ईपीएफओच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.