Pune News : रिक्षाचालकांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘सूर्योदय ते सूर्यास्त’ जागर उपोषण

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना शासनाकडून मदत मिळावी या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा पंचायतीच्या प्रतिनिधींनी आज सकाळपासून पुण्यातील विधान भवनाबाहेर उपोषण सुरू केले आहे.

विधान भवनाबाहेर सुरू असलेले हे उपोषण आज सूर्यास्तापर्यंत चालणार आहे. रिक्षा पंचायतीच्या प्रतिनिधीने सुरू केलेल्या या उपोषणात रिक्षाचालकांचे विभागनिहाय प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

पुणे विभागीय आयुक्तांना रिक्षाचालकांच्या अडचणी संदर्भातील एक निवेदन देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून रिक्षाचालकांचा प्रश्नांची सोडवून होत नसून विभागीय आयुक्तांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांच्याकडे यावेळी करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.