-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे कचरा संकलनाचे काम खासगी कंपनीला देण्याचा घाट

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – शहर ‘कंटेनर मुक्त’ करणाऱ्या स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच्या कष्टकऱ्यांची चळवळ मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कचरा संकलीत करण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्याचा घाट घातण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कंटेनर मुक्त पुणे करण्यासाठी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने 2008 साली ‘स्वच्छ सेवा सहकारी संस्थे’ची स्थापना झाली. शहरातील कचरा पेट्या काढून टाकण्यात आल्या आणि घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची अभिनव व्यवस्था अस्तित्वात आली. मागील 13 वर्षे घरोघरी जावून कचरा संकलीत करण्याचे काम स्वच्छ संस्थेचे सेवक करत आहेत.

या कचरा वेचकांनी कोरोना काळातही अव्याहतपणे काम केले आहे. मात्र आते हे काम एका खासगी कंपनीला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिका प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधीत कंपनीने त्याचे सविस्तर ‘सादरीकरण प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे स्वच्छच्या साडेतीन हजारांपेक्षा अधिक कचरा वेचकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी ‘स्वच्छ’ला दिलेली ही मुदतवाढ शेवटची आहे. दोन महिन्यांनंतर याबाबत अंतिम निर्णय घेऊ असे सांगितले आहे. मात्र, हे सांगताना स्वच्छ सोबत पुन्हा करार करणार की निविदा काढणार याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn