Pune News : साडेतीन कोटी रुपये किमतीची महागडी झाडे खरेदीची निविदा अखेर रद्द

सुभाष जगताप यांनी उठवला होता आवाज : Tender for purchase of expensive trees worth Rs 3.5 crore finally canceled

एमपीसी न्यूज – सॅलसबरी पार्क येथील उद्यानासाठी साडेतीन कोटी रुपये किंमतीची 65 महागडी झाडे खरेदी करण्याच्या स्थानिक नगरसेवकाच्या प्रयत्नांना महापालिका प्रशासनाने धक्का दिला आहे. कोरोनाच्या संकट काळात जुन्याच निविदेवर होत असलेल्या खरेदीवरून जोरदार टीका झाल्याने प्रशासनाने ही निविदा प्रक्रिया रद्द केल्याचे आज जाहीर केले.

सॅलसबरी पार्क येथील एका उद्यानात टॉपीआरी प्रजातीची महागडी झाडे खरेदी करण्यासाठी दोन वर्षापुर्वी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

सुमारे सव्वा पाच लाख ते 14  लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या या महागड्या झाडांवर लक्षावधी रुपये खर्च आणि कायम स्वरूपीच्या मेन्टेंनन्स खर्चावरून मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यामुळे ही झाडे खरेदी थांबविण्यात आली होती.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, यासाठी प्रयत्न करणारा भाजपचा पदाधिकारी आणि स्थानिक नगरसेवकाच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने पुन्हा ही झाडे खरेदीची निविदा राबविली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांनी दोन दिवसांपुर्वी हा प्रकार उघडकीस आणत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.

आपचे अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनीही या खरेदीवर टीका करताना झाडांची खरेदी रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी झाडांची खरेदी रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.