Talegaon crime News : मजुरीच्या पैशांवरून कुऱ्हाडीने जावयाचा खून; सासरा पोलिसांच्या ताब्यात

सुनील रामचंद्र जाधव असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे.

एमपीसी न्यूज – मजुरीच्या पैशांवरून झालेल्या वादातून सासऱ्याने जावयाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. ही घटना आज (गुरुवारी, दि. 20) दुपारी तीन वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे मारुती चौकाजवळ घडली.

सुनील रामचंद्र जाधव असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तू बाळू मोहिते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील आणि आरोपी दत्तू हे नात्याने जावई व सासरे आहेत. त्या दोघांमध्ये मजुरीचे पैसे कमी दिल्याच्या कारणावरून गुरुवारी दुपारी अडीच वाजता वाद झाला.

वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि त्यातच दत्तू याने आपल्या जावयावर कुऱ्हाडीने घाव घालून जखमी केले. जखमी सुनील यांना उपचारासाठी तळेगाव जवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सुनील यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपी सासरा दत्तू याला ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.