Pune News : ससूनमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र तपासणी कक्षासह स्वच्छतागृह उभारणार !

एमपीसी न्यूज : समाजातील दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या तृतीयपंथीयांना समानतेची वागणूक देण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात आरोग्यसेवेसाठी स्वतंत्र तपासणी केंद्र तसेच स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणी करणार असल्याची माहिती राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिली.

या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन ससूनचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांना खा.चव्हाण यांनी शिष्टमंडळासह भेट घेत सादर केले. याप्रसंगी तृतीयपंथीय प्रतिनिधी सोनाली दळवी, प्रेरणा वाघेला, मयुरी यांच्यासह नितीन कदम, मनाली पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खा.चव्हाण म्हणाल्या, कुटुंबियांनी झिडकारलेले समाजाने दुर्लक्षित केलेल्या तृतीयपंथीयांना समानतेची वागणूक देण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. ससूनमध्ये उपचार मिळण्यासाठी स्वतंत्र ओपीडी, स्वच्छतागृह उभारण्याचे आश्वासन ससून प्रशासनाने दिले आहे.

येत्या 26 जानेवारी दरम्यान ही उभारणी केली जाईल. तसेच राज्यसरकारकडून स्वस्त धान्य देण्यासंदर्भात पाठपुरावा घेणार आहोत. सर्व तृतीयपंथीयांना रेशनकार्ड देण्याची मागणी सरकारकडे करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.