Pune News : लष्कर आणि बंडगार्डन भागातील पाणीपुरवठा शुक्रवारी संपूर्ण दिवस बंद

एमपीसी न्यूज – लष्कर आणि बंडगार्डन जलकेंद्र भागातील पाणीपुरवठा शुक्रवारी (दि.17) संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. तसेच, शनिवारी (दि.18) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

लष्कर आणि बंडगार्डन पाणी पुरवठा केंद्राअंतर्गत मुख्य जल वाहिन्या वरील देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. तसेच लष्कर पंपिग येथील पंपिगचे देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार असल्याने शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे
या भागातील पाणी पुरवठा असेल बंद
बंडगार्डन जलकेंद्र – संपूर्ण खराडी, वडगावशेऱी मधील गणेश नगर, आनंद पार्क, माळवाडी, मुक्ताई नगर व इतर.
लष्कर जलकेंद्र – संपूर्ण केशवनगर, मुंढवा व इतर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.