Pune News : येत्या गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीयेला होणार सुरुवात

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस दलातील पोलीस (Pune News) शिपाई चालक भरती प्रकीयेला 18 फेब्रुवारी पोसून सुरुवात झाली आहे. त्यातील महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीया येत्या गुरुवार (दि.9) पासून सुरु करण्यात येणार आहे.

Smart City : स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आणि आर. फ्रिक्शन एंटरटेनमेंट यांच्यात सामंजस्य करार

 

मध्यतंरी पोटनिवडणूक प्रक्रियेमुळे या भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती मात्र पुन्हा ही प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार असून ज्या महिला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांनी महा आयटी वेबसाईटवरून प्रवेशपत्र प्राप्त करावे. प्रवेशपत्रावरील (Pune News) तारखेनुसार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करीता पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे उपस्थित रहावे, अशी माहिती पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.