Pune News: मोदी सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने राज्यव्यापी सायकल रॅली

एमपीसी न्यूज: इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन दिवाळीत सामान्य माणसाचे दिवाळे निघणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवसेनेकडून रविवार दि. 31 ऑक्टोबर रोजी, राज्यव्यापी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे शहर युवा सेनेच्यावतीने इंधन दरवाढीचा सायकल रॅलीद्वारे तीव्र निषेध करण्यात येणार आहे. सारसबाग येथे रविवारी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता या सायकल रॅलीला सुरुवात होईल. सिलाई चौक, शनिपार, अप्पा बळवंत चौक येथून उजवीकडे वळून फरासखाना, दगडूशेठ मंदिर, समाधान चौक, पुन्हा उजवीकडे वळून लक्ष्मीरोड येथून खंडूजी बाबा चौक येथे रॅलीची समाप्ती होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.