Pune News : पुण्यात 11 व 12 डिसेंबरला इंटरनॅशनल पेन फेस्टीवल, जगविख्यात पेन पाहण्याची संधी

एमपीसी न्यूज – पुण्यात 11 व 12 डिसेंबरला इंटरनॅशनल पेन फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात जगविख्यात एक हजारापेक्षा अधिक पेनचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. व्हिनस ट्रेडर्सतर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

दिनांक 11 आणि 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे पेन फेस्टीवल होणार असून  सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती आयोजक सुरेंद्र करमचंदानी यांनी दिली.

पार्कर, वॉटरमन, मॉन्ट ब्लॅक जर्मनी, वॉल्डमन, शेफस, मॉन्टी वदे, स्क्रिक्स टर्की, लॅमी जर्मनी, पायलट, प्लॅटिनम, फ्लेक्सबुक ग्रीस, लिओनार्डो, मॅग्ना कार्टा यासरखे विंटेज व महागडे पेन नागरिकांना प्रदर्शनात पाहता येतील. फेस्टीवलमध्ये 200 रुपयापासून ते 4 लाख रुपये किमतीचे पेन पाहता येणार आहेत. फाउंटन पेन, बॉल पेन, रोलर पेन, मल्टिफंक्शनल पेन, कॅलिग्राफी पेन,यांत्रिक पेन्सिल, शाईची विविध 500 श्रेणी पेन फेस्टीवलमध्ये पाहायला मिळेल.

यावेळी पाच लाख मराठी स्वाक्षरी करणारे आणि मराठी स्वाक्षरीची जागृती करणारे कलाशिक्षक गोपाल वाकोडे उपस्थित राहून यावेळी प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. तसेच प्रा. यशवंत पिटकर फाऊंटन पेन या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.