Pune News : विरोधकांनी राज्यपालपदाची गरीमा राखावी : चंद्रकांतदादा पाटील

एमपीसी न्यूज : राज्यपाल भाजपाला झुकतं माप देतात अशी चर्चा करणाऱ्या विरोधकांनी राज्यपालपदाची एक गरिमा असते, ती राखली गेली पाहिजे, असा खोचक सल्ला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

पुणे महापालिकेत एका बैठकीसाठी आले असता पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विधान परिषदेच्या जागेवरून अनेक नावे पुढे येत आहे. मात्र राज्यपाल हे तेथील खुर्चीत बसून भाजपाची भूमिका मांडत आहे. त्याबाबत राज्यपालांनाच विचारा मी त्यावर बोलणार नाही. राज्यपालपदाची गरिमा राखली गेली पाहिजे, अशी चर्चा करणारे विरोधक ती राखत नाहीत, अशी टिका त्यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरे घराबाहेर पडतच नाहीत….

मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय हे सरकार अभ्यास करत नाही, कोणाचाही सल्ला घेत नाही. ‘हम करे सो’ कायदा हे असं या ठाकरे सरकारचं धोरण आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर पडायलाही तयार नाहीत. विद्यार्थी फी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे बोलताना दिसत नाहीत. दोन राजे खासदार असलेल्या पक्षाचा मी प्रदेश अध्यक्ष आहे. त्यामुळे मी बोललो म्हणजे सगळे खासदार, आमदार बोलले, असेही पाटील यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.