Pune News; सुनेत्रा पवार यांनी साकारली महादेवाची चक्क्याची पिंड

 एमपीसी न्यूज:  बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी चक्क्याची महादेवाची पिंड साकारली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सकाळी त्या दर्शनाकरिता आल्या होत्या. 
यावेळी दत्त मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील रुकारी, खजिनदार राजू बलकवडे, विश्वस्त ऍड शिवराज कदम जहागीरदार, युवराज गाडवे आदी उपस्थित होते.
सुनेत्रा पवार यांनी चक्क्याचा उपयोग करून दहा मिनिटात चक्रेश्वर महादेव साकारले. तसेच आरोग्यसंपन्न महाराष्ट्राकरिता दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना देखील केली. सुमारे 51 किलो चक्का वापरून ही पिंड साकारण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=BKm22kBo4gw&t=7s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.