Pune : अमित शहा यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारे NSUI चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज- पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या ताफ्याला पुण्यातील एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी या कार्यकर्त्यांनी अमित शहा ‘गो बॅक, नोकऱ्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमच येथे अमित शहा यांनी पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदार संघातील शक्ती केंद्र प्रमुखांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी निघालेल्या शहा यांच्या ताफ्याला टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात काळे झेंडे दाखवण्यात आले.

एनएसयुआयच्या 13 कार्यकर्त्यांना स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असून तेथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.