Pune: शहरात सात दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, 1300 वर गेला आकडा

ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करा - भाजप

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी चिंता वाढविणारी ही बातमी असून, 7 दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट झाले आहे. पुण्यातील संक्रमण रेट हा डबल असून, या रोगाचे रुग्ण आता 1300 च्या वर गेले आहे. तर, 80 नागरिकांचा बळी गेला आहे. सर्वात जास्त बळी ससून रुग्णालयात होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या डीनपदी अनुभवी अधिकारी नियुक्ती करा, अशी मागणी भाजपतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची शासनाने तडकाफडकी बदली केल्यानंतर त्यांच्या जागी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक न झालेली नाही. कोरोना सारख्या संकटाशी मुकाबला करताना ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी अनुभवी अधिकारी असणे गरजेचे आहे, असे भाजपने म्हटले आहे.

 रोज 70 ते 100 रुग्ण सातत्याने वाढत आहेत. सात दिवसांत कोरोनाचा रुग्णांत दुप्पट वाढ झाली आहे. पुण्यातील पेठा, दाटवस्ती, झोपडपट्ट्यामध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. लोकडाऊन करून ही रुग्ण वाढतेच आहेत. कॉमन टॉयलेट – बाथरूमचा वापर होत असल्याने या भागातील नागरिकांना हलविण्याचे नियोजन सुरू आहे. भवानी पेठ, कसबा – विश्रामबागवाडा, येरवडा – कळस – धानोरी, बिबवेवाडी, मुंढवा, हडपसर, नगररोड, शिवाजीनगर –  घोलेरोड भागांत कोरोना सातत्याने वाढताच आहे.

पुणे जिल्ह्यात केंद्रीय पथकाने पिंपरी-चिंचवड, बारामतीमध्ये पाहणी केली. जिल्हा परिषदेचे नियंत्रण कक्ष, महापालिकेचे नियंत्रण कक्ष व हॉस्पिटल्सची पाहणी केली. या दरम्यान काही सूचनाही दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.