Pune News: ससून रुग्णालयातून रुग्णांच्या नातेवाईकांच्या गाड्या चोरणारा गजाआड, 13 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज: ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेट देण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या दुचाकी गाड्या चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अख्तर चांद मुजावर (वय 44, रा. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे या सराईत चोरत्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी त्याने पुणे शहर आणि सातारा शहरातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ससून रुग्णालयातून दुचाकी चोरी केल्या संबंधी सैफन चांद साब मुजावर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.. या गुन्ह्याचा तपास संदर्भात पोलिसांनी तब्बल दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासले.. यातील सीसीटीवी मधून दुचाकी चोरणारा आरोपी साताऱ्यातील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने आरोपीचा शोध घेऊन सातारा येथे जाऊन त्याला बेड्या ठोकल्या. त्याने चोरलेल्या तेरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व दुचाकी त्याने पुणे शहर, हडपसर, निगडी, स्वारगेट, सातारा शहरातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.