Mumbai: विविध सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतन कपात करु नका -बाळासाहेब पाटील

किमान वेतन देण्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांबरोबर बँकेच्या तसेच पतसंस्थांच्या व्यवहारावरही परिणाम झाला आहे. सहकारी बँकांनी तसेच पतसंस्थानी, विविध सहकारी संस्थांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करु नये, त्यांना किमान वेतन द्यावे, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज (सोमवारी) केले आहे.

लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांबरोबरच बँकेच्या तसेच पतसंस्थांच्या व्यवहारावरही परिणाम झाला आहे. तरी राज्यातील सहकारी बँका पतसंस्था यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करु नये त्यांना किमान वेतन द्यावे.

राज्यातील विविध मार्केट कमिट्या सुरु आहेत या मार्केट कमिट्यांमधील अधिकारी व कामगारांचे वेतन कपात करु नये, असेही आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.