Chinchwad : अंमली पदार्थविरोधी पथकाने केली 92 लिटर ताडी जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणावर कारवाई करत 92 लिटर ताडी जप्त केली आहे. ही ताडी आरोपी विक्रीसाठी घेऊन जात होता. रविवारी (दि. 26) दळवीनगर, झोपडपट्टी येथे दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.

राहुल प्रसाद मोरे (वय 28, रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद कलाटे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवीनगर झोपडपट्टी येथे रेल्वे पटरीच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये दक व्यक्ती बेकायदेशीररित्या दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी शेडवर छापा मारून दोन नायलॉनच्या पोत्यामधून 7 हजार 360 रुपयांची 92 लिटर ताडी जप्त केली. आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच त्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like