Pune : वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा (Pune) खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.9) बुधवार पेठेतील क्रांती चौकात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक केली.

नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख याला अटक करण्यात आली.

Pune : कमळावर बसून आलेल्या लक्ष्मीचा भारताला आशीर्वाद आहे – हेमंत लेले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे. आरोपी कलाम शेख तिचा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी तिने नईम शेख याच्याशी विवाह केला होता. दोघेजण एकत्र राहत होते. पत्नीने दुसरा विवाह केल्याने कलाम चिडला होता. तो नईमच्या मागावर होता. बुधवार पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डिंग जवळ शुक्रवारी सायंकाळी कलाम थांबला होता. काही वेळानंतर नईम तेथे (Pune) आला. त्याने खिशातून वस्तरा काढला. नईमच्या गळ्यावर वस्तऱ्याने वार केला.

गंभीर जखमी झालेल्या नईमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कलाम घटनास्थळावरून पसार झाला. तो साथीदारासोबत पश्चिम बंगालला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली.पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला साथीदारासह रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.