Pune Peoples Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडून बबनराव भेगडे यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पुणे पीपल्स बँकेच्या संचालकपदी (Pune Peoples Bank) चौथ्यांदा विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल संचालक बबनराव भेगडे यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडून सन्मान करण्यात आला. संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे येथे पार पडली. या सभेमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. बबनराव भेगडे हे पुणे जिल्हा सहकारी बोर्डावर गेली 25 वर्षे संचालक आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे, उपाध्यक्ष  हिरामण सातकर, संघाच्या सी.ओ. सोनाली रावल (सह.निबंधक) यांच्याकडून बबनराव भेगडे यांची पुणे पीपल्स बँकेचे संचालकपदी चौथ्यांदा विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आणि अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे सर्व संचालक आणि राज्यातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भेगडे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (Pune Peoples Bank) अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली असून श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक आहेत. तसेच मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणूनही कार्यरत होते तर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही चार वेळा यशस्वी कारकीर्द भूषवली.  भेगडे यांनी अनेक सहकारी संस्थांना मार्गदर्शन करून सहकार्य करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.