Talegaon Dabhade : पुणे पीपल्स बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य ग्राहक मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – पुणे पीपल्स को. ऑप. बँकेच्या तळेगाव स्टेशन शाखेचा 22वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 6 मे) साजरा होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आणि भव्य ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी याबाबत माहिती दिली. वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आणि भव्य ग्राहक मेळाव्याचे आयोजन बँकेच्या वतीने करण्यात आले असल्याने ग्राहक, हितचिंतक व ठेवीदारांनी महापूजेचा तसेच मेळाव्याचा सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लाभ घ्यावा, असे जाहीर निमंत्रण बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते व उपाध्यक्ष सुभाष गांधी यांनी दिले आहे.

 

बँकेच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त दुपारी 3 वाजता जनरल हॉस्पिटलच्या रिक्रिएशन हॉलमध्ये भव्य कामगार मेळावाही आयोजित केला असून परिसरातील औद्योगिक वसाहत, संस्था आदी क्षेत्रातील कामगार वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक सरव्यवस्थापक संजय जाधवर आणि शाखा व्यवस्थापक अजय शेठ यांनी केले आहे. आजवर बँकेने कामगारांच्या भविष्याचा वेध घेत मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण केले असून चाकण, महाळुंगे, उर्से, नवलाख उंब्रे एमआयडीसीसह इतरही औद्योगिक संस्था व विविध कर्मचार्‍यांच्या मागणीनुसार कर्जपुरवठा केला आहे. कामगारांच्या स्वत:च्या हक्काच्या घरांच्या उभारणीसाठी मोठ्या स्वरुपात हातभार लावला आहे. ग्राहकांना आकर्षक व्याजदराच्या माध्यमातून वाहन कर्ज, सोने तारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, गृहकर्ज तसेच ठेवीदारांसाठी देखील ठेवींवर आकर्षक व्याजदर देऊन ग्राहकहित गेली अनेक वर्षे जपण्याचा संचालक मंडळाचा मानस असून बँकेतील कर्मचारी देखील अत्यंत चांगल्या प्रतीची सेवा देण्यास कटीबद्ध आहे.

 

पुणे पीपल्स को.ऑप. बँक लि. पुणे बँकेने मल्टिस्टेट बँकेचा दर्जा प्राप्त केला असून 1952 साली स्थापन झालेल्या बँकेने 31 मार्च 2022 पर्यंत 2072.87 कोटींचा एकूण व्यवसाय केला असून एकूण ठेवी 1273.75, एकूण कर्ज 799.12 आणि बँकेचा एकूण 15.50 कोटी नफा असून त्यातील तळेगाव शाखेचे मोलाचे योगदान आहे. तळेगाव शाखेने 31 मार्च 2022 पर्यंत 180 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असून 42.46 कोटी ठेवी, 137.74 कोटी कर्जवाटप, शाखेचा निव्वळ नफा 6.57 कोटी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.