Pune : अनुराधा करमरकर यांना हॉटेल मॅनेजमेंट विषयातील पीएच.डी.

हॉटेल मॅनेजमेंट विषयातील पहिलीच पीएच.डी

एमपीसी न्यूज- ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’च्या ‘कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नोलॉजी’ च्या प्राध्यापक अनुराधा करमरकर यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ‘अ स्टडी ऑफ चॅलेंजेस फेस्ड् बाय वूमन एम्प्लॉयिज विथ रेफरन्स टू फाईव्ह अ‍ॅण्ड फोर स्टार हॉटेल्स इन पुणे’ या विषयातील संशोधन प्रबंधाला पीएच. डी. मिळाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हॉटेल मॅनेजमेंट विषयात दिलेली ही पहिलीच पीएच.डी. आहे. हॉटेल मॅनेजमेंट (फॅकल्टी ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट) विभागांतर्गत ही पीएच.डी. देण्यात आली. अनुराधा करमरकर या दोन दशकांपासून ‘कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नोलॉजी’ येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना डॉ. सीमा झगडे यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.