Pune : जेजुरी- मोरगाव मार्गावर खासगी बस उलटली; अंदाजे 50 प्रवासी जखमी, जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज – जेजुरी – मोरगाव मार्गावर सिमलेस कंपनी काळा ओढ्याजवळ खासगी बस पलटी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. यात अंदाजे 50 प्रवासी जखमी झाले आहे. यातील जखमींना जेजुरीतील विविध रुगालयात उचारासाठी दाखल केले आहे. बसमध्ये अंदाजे  40 ते 50 प्रवासी होते. बसमधील सगळे प्रवासी हे बीड, जालना, परभणी भागातील असून सगळे प्रवासी देवदर्शनासाठी पुणे जिल्ह्यात आले होते.

सकाळी मोरगाव येथील गणपतीचे दर्शन करून सगळे जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी येत होते. मात्र, सिमलेस कंपनी काळाओढ्या जवळ रस्त्याचे काम चालू असल्याने तसेच समोरून दुसरी गाडी आल्याने बाजू (साईट) देतेवेळी हि बस पलटी होऊन अपघात झाला.

दुपारच्या वेळी हा अपघात झाला असून अंदाजे  40 ते 50 जखमी झाले आहे. यातील जखमींना जेजुरीतील विविध रुगालयात उचारासाठी दाखल केले आहे. जेजुरी पोलीस घटनासथळावर दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.