Pune : कचरा वेचक आणि घरकाम करणाऱ्यांना अन्नधान्याची व्यवस्था करा – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मागणी

Provide food to garbage collectors and house workers- Demands Bahujan Republican Socialist Party

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात असंख्य कचरा वेचणारे तसेच घरकाम करणारे मजूर आहेत. या मजुरांजवळ रेशन कार्ड नसल्यामुळे त्यांना अन्नधान्य मिळत नाही. त्यामुळे उपासमारीला सामोरे जाणाऱ्या या मजुरांना महापालिकेमार्फत अन्नधान्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राम बनसोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा वेचणारे तसेच घरकाम करणारे मजूर राहतात.

कोरोना विषाणूमुळे त्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर या मजुरांकडे रेशन कार्ड नसल्यामुळे सरकारकडून मिळणारे अन्नधान्य देखील त्यांना मिळत नाही.

अन्न पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड नसलेल्या मजुरांचे फॉर्म भरून घेतले जात होते. मात्र, त्याची सुद्धा मुदत संपली असून या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.