Pune : विश्वचषक सामन्यांत पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर पुण्यात जल्लोष

एमपीसी न्यूज- विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर रविवारी (दि. 16) रात्री पुण्यात जल्लोष आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सर्वत्र तिरंगा भगव्या पताका आणि फटाक्यांची आतषबाजी करीत आणि तिरंगा फडकावत तरुणाई उतरली होती. संपूर्ण फर्ग्युसन रस्ता डेक्कन मार्ग परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.

दुचाकीवरून शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन काही उत्साही तरुणांनी दुचाकी रॅली काढण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील डेक्कन चौकातील उत्साही क्रिकेटप्रेमींना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यावेळी चार ते पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला. मध्यरात्री 1 वाजल्यानंतरही क्रिकेट शौकिनांचा उत्साह कमी झाला नव्हता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.