Talegaon Dabhade : बाळा भेगडे यांच्याकडे कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन खाते

एमपीसी न्यूज- भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा रविवारी राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला असून त्यांच्याकडे कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन खाते सोपवण्यात आले आहे. बाळा भेगडे यांनी रविवारी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

बाळा भेगडे यांच्यासहित एकूण १३ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे तर विद्यमान ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. रविवारी रात्री उशिरा नव्या मंत्र्यांचे खातेवाटपही जाहीर झालं असून बाळा भेगडे यांच्याकडे कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन खात सोपवण्यात आल आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळला मंत्रिपद मिळावे, अशी भाजप कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. त्यामुळे मावळातीलभाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.