Pune : पुण्याला 45 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, मे पासून पाणी टंचांईला सामोरे जावे लागण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये (Pune) मिळून सध्या केवळ 10.22 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पुणे शहराला जेमतेम 45 दिवस पुरेल एवढा च पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या मे, जूनमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार धरणांमधील एकूण पाणीसाठा हा यंदा 2.62 टीएमसीने कमी झाला आहे.

शहराला खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधील पाण्याद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा 29.15 टीएमसी आहे. यापैकी सध्या या धरणांमध्ये सध्या केवळ 10.22 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षीच्या आजच्या तारखेला या चार धरणांमध्ये मिळून एकूण 12.84 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

Maharashtra : साताऱ्यातून उदयनराजे भोसले लढणार लोकसभा निवडणूक

खडकवासला प्रकल्पांतील उपलब्ध पाणी साठ्या पैकी शहराला पिण्यासाठी सुमारे तीन टीएमसी इतकेच पाणी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध होणारा हा पाणीसाठा शहराला आणखी केवळ दीड महिना पुरेल इतकाच आहे. जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला 14.61 टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला 20.49 टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी 1.70 टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते.

त्यातच आता उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी 23 गावे ही महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी लागत आहे. यानुसार सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा फार फार तर मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरू शकणार असल्याचे जलसंपदा विभागाचा अंदाज (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.