Pune : पुण्याचा पारा 36 अंशावर,  पुढील तीन दिवसांत पारा वाढण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – शहरात महाशिवरात्रीनंतर उन्हाच्या तडाख्यात (Pune) वाढ झाली आहे. कमाल तापमानाने रविवारी (दि.1036.9 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. किमान तापमान सरासरी इतके म्हणजे 14.8 अंश सेल्सिअस नोंदवले. पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात अंशतः वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या सोमवारी (दि.4) कमाल तापमानाचा पारा 33.6 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला होता. तो आठवड्याभरात प्रत्येक दिवशी वाढत गेला. आठवड्याभरात किमान तापमान 3.3 अंश सेल्सिअसने वाढले.

Pune : पद्मश्री पं व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने नादमुद्रा महोत्सवाचा समारोप

शहरात कोरेगाव पार्क भागात सर्वाधिक म्हणजे 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.पुणेचिंचवडलोहगावचिंचवडमगरपट्टाएनडीए येथे कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शहरातील सर्वांत कमी कमाल तापमानाची नोंद पाषाण येथे 36 अंश सेल्सिअस झाली.

राज्यातील बहुतांश शहरांमधील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राज्यात सोलापुरात सर्वाधिक म्हणजे 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाच्या पाऱ्याने 37 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याचेही हवामान खात्याने (Pune) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.