Pune : पुणे महापालिका ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ योजने अंतर्गत जमा करणार जुन्या वस्तू

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने केंद्र सरकारच्या ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ या मोहिमे अंतर्गत पुनर्वापर (Pune)  होऊ शकणाऱ्या जुन्या वस्तू जमा करण्यासाठी  शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत 17 ठिकाणी केंद्र तयार केले आहेत. ‘रिड्युस, रियुज व रिसायकल’ (आर.आर.आर.) या नावाने संबंधित केंद्र असून त्यामध्ये जुने कपडे, मुलांची खेळणी, भांडी यांसारख्या वस्तू जमा करता येणार आहेत.

Pune : महाविद्यालयाच्या प्रयोग शाळेत आग, शैक्षणिक साहित्य जळून खाक

पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्था यांच्या मदतीने ‘स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेमध्ये ‘आर.आर.आर.’नुसार पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत.

त्यामध्ये जुनी पुस्तके, पेपर, मॅगझीन, कार्डबोर्ड, प्लॅस्टिक, थर्माकोल, फर्निचर, काच, काचेच्या बाटल्या, भांडी, ई कचरा, जुनी कपडे, पादत्राणे यासह इतर वस्तू गोळा करण्यात येणार आहेत. पर्यावरणपुरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेमध्ये आत्तापर्यंत बाराशेहून अधिक नागरिकांनी सहभाग (Pune)  घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.