Pune : इतिहास, संस्कृती, परंपरा जपा- उपराष्ट्रपती

'पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना प्रदान

एमपीसी न्यूज- पुणे हे ऐतिहासिक, सुंदर शहर आहे. पुणे सांस्कृतिक केंद्र आहे. पुणे हे समता आणि स्वातंत्र्या लढयाचे केंद्र राहिले आहे, असे सांगून उपराष्ट्रपतींनी इतिहासातील महनीय पुणेकरांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. निमित्त होते ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) आयोजित पुण्यभूषण पुरस्कार’ सोहळ्याचे. यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते उपराष्ट्रपती बोलत होते.

या कार्यक्रमाला डॉ शां ब मुजुमदार, चंदू बोर्डे, डॉ प्रभा अत्रे, डॉ के एच संचेती हे पद्म पुरस्कार प्राप्त पुणेकर उपस्थित होते. सभागृहात खासदार गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण, महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती होती. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. एक लाख रूपये आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली बालशिवाजींची प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थीना गौरविण्यात आले. यामध्ये वीरमाता लता नायर, मोहम्मद चांदभाई शेख, नाईक फुलसिंग, हवालदार प्रमोद सपकाळ, हवालदार गोविंद बिरादार यांचा समावेश होता.

_MPC_DIR_MPU_II

मराठीत सुरवात करुन एम.व्यंकय्या नायडू यांनी पुणेकरांची मने जिंकली. प्रतिष्ठीत व्यक्तींना गौरविण्याच्या या प्रथेची प्रशंसा करतो, असे नायडू म्हणाले. पुणे हे ऐतिहासिक, सुंदर शहर आहे. पुणे सांस्कृतिक केंद्र आहे. पुणे हे समता आणि स्वातंत्र्या लढयाचे केंद्र राहिले आहे, असे सांगून उपराष्ट्रपतींनी इतिहासातील महनीय पुणेकरांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. भांडारकर, दांडेकर, देव, ढवळीकर, मते अशा पुणेकरांच्या पुरातत्व क्षेत्रातील कामाची नायडू यांनी प्रशंसा केली.आंतरशाखीय अभ्यास इतिहासातील गुहये, गुपीते शोधून काढण्यात उपयुक्त ठरेल, असेही श्री. नायडू यांनी सांगीतले. इतिहास, परंपरा, संस्कृती जपून आपला पाया बळकट केला पाहिजे. त्या तून एकात्मता वाढत राहील. देश, पुढील पिढी बळकट होईल, असे नायडू म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. देगलूरकर म्हणाले, “मराठवाडयातून आलेल्या माझ्यासारख्या ला पुण्यभूषण पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराचे कार्यक्षेत्र वाढल्याचा आनंद आहे.ज्ञानाची मशागत व्यासंगाने करीत राहिले पाहिजे. नवा इतिहास प्राचीन गोष्टी पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. ‘ माती त जन्मती, मातीत मरशी, या उक्तीला जोडून मातीत उत्खननास जुळशी ‘ अशी ओळ मला जोडावीशी वाटते. भारतीय संस्कृतीत मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्राला महत्व असते. मंदिर ही सामाजिक व्यवस्था आहे. ही संस्कृती अक्षुण्ण राहण्यात मूर्तिशास्त्राचे महत्वाचे योगदान आहे”

डॉ. प्रभा अत्रे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1