Pune : बिबवेवाडीत जुगार अड्ड्यावर छापा; 26 जण ताब्यात, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पुण्यातील बिबवेवडी परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी आज दुपारी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या 26 जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून 27 मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.

बिबवेवाडीतील स्वामी समर्थ नगरमध्ये दररोज जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी याची खातरजमा करत आज दुपारच्या सुमारास छापा मारला आणि ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.