Pune Rain Update : पुणे अग्निशमन दलाकडे दोन तासात 5 ठिकाणी झाडपडीच्या तर 8 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना

एमपीसी न्यूज : गेल्या दोन तासात पुण्यामध्ये (Pune Rain Update) ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले असून झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन तासात कोसळणारया मुसळधार पाऊसामुळे अग्निशमन दलाकडे 8 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना तर 5 ठिकाणी झाडपडीच्या नोंदी आल्या असून अग्निशमन अधिकारी व जवान प्रत्यक्ष घटनास्थळी काम करत आहेत.

पुढील ठिकाणी साचले आहे पाणी :

1) चंदननगर पोलिस स्टेशन
2) वेदभवन, कोथरुड
3) वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड
4) लमाण तांडा, पाषाण
5) सोमेश्वर वाडी, पाषाण
6) वानवडी, शितल पेट्रोल पंप
7) बी टी ईवडे रोड
8) कात्रज उद्यान

Pune Rain Update : केवळ दोन तासात पुण्यात भरले पाणी??? नागरिकांचा प्रशासनावर संताप

झाडपडीच्या घटना :

1) एनसीएल जवळ, पाषाण
2) साळुंखे विहार, कोंढवा
3) ज्योती हॉटेल जवळ, कोंढवा
4) चव्हाणनगर
5) रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन

पावसाची नोंद – 

1) वडगावशेरी 112.0मिमी
2) मगरपट्टा 96.5 मिमी
3) पाषाण 83.0 मिमी
4) येरवडा 76.0 मिमी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.