BNR-HDR-TOP-Mobile

Pune : काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांना तात्पुरता दिलासा; हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या काँग्रेस
नगरसेवक अरविंद शिंदे यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून न्यायालयाने त्यांचा हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
२७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

महापौर मुक्ता टिळक यांच्या कक्षात सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान निंबाळकर आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक यांच्यात “तू तू, मै मै’ झाली होती. यावेळी निंबाळकर यांना मारहाण झाली होती. त्यानंतर याप्रकरणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि आणखी काही कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • वकील विजय ठोंबरे आणि रुपाली पाटील यांनी अरविद शिंदे यांच्यातर्फे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सत्रन्यायाधीश ए.वाय. थत्ते यांच्यासमोर यावर सुनावणी झाली.

अरविंद शिंदे यांनी राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केली नाही अथवा सरकारी कामात अडथळाही आणलेला नाही. त्यांनी जलपर्णी निविदेतील गैरप्रकार समोर आणला, म्हणून त्या द्वेषातून शिंदे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांना अटक पूर्व जामीन मिळावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. पोलिसांनी या अर्जावर बाजू मांडावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.