Pune : व्यापार्यांच्या दृष्टीने समाधानकारक अर्थसंकल्प- रायकुमार नहार

एमपीसी न्यूज – केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Pune)लोकसभेत सन 2024-25 साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प निवडणूकपूर्व अंतरीम अर्थसंकल्प असल्यामुळे प्रथेप्रमाणे कररचनेत कोणताही बदल सुचविलेला नाही.

परंतु, एंकदरीत रोख पाहता शेतकरी, युवा, महिला सक्षमीकरणाच्या (Pune)माध्यमातून देशाला आर्थिक प्रगतीकडे नेणारा सदरचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिली.

Chikhali : विनापरवाना दारु विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

तसेच छोटया व्यापार्यांसाठी कर आकारणीसाठी जमा खर्च ठेवण्यासाठी उलाढालीची मर्यादा वार्षिक2 कोटीची 3कोटी केली आहे व प्रोफेशनल व्यावसायिकांसाठीची मर्यादा 50 लाखाची 75 लाख केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील वित्तिय तुट2026पर्यंत 4.5 पर्यंत आणण्याचे उदिष्ट चांगले आहे. त्यामुळे गुतवणूकदारांचा विश्वास वाढेल व विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.