Pune : बंधुता साहित्य परिषदे तर्फे शनिवारी ‘त्रिवेणी संगम’

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, नवी दिल्ली येथे होणाऱ्या २१ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया आणि सहाव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्रा. अरुण आंधळे यांचा सत्कार आणि कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘काळी आई’ काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन असा ‘त्रिवेणी संगम’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. १३ एप्रिल) सकाळी साडे दहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते सत्कार व प्रकाशन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे असणार आहेत. उद्योजक प्रा. विनोद गलांडे पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे व बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत रोकडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.