Pune News : श्माल्झ इंडिया ने नवीन उत्पादन युनिट सुरू करण्याची केली घोषणा

एमपीसी न्यूज – भारतातील आपल्या व्यवसायाचा विस्तरा करण्याचा दृष्टिकोन बाळगत श्माल्झ इंडिया प्रा. लिमिटेडने आज (Pune News) पुण्यातील आपले नवीन उत्पादन युनिट सुरू करण्याची घोषणा केली.

श्माल्झ इंडिया प्रा. लिमिटेड ही 1999 पासून भारतीय उप-कंपनी असून 500 चौ. मीटरच्या छोट्याशा कार्यालयापासून 2003 मध्ये भोसरी येथे 1000 चौ. मीटरचा कारखाना आणि नंतर 2007 मध्ये 4000 चौ. मीटरपर्यंत तिने प्रवास केला आहे. आता त्याही पुढे जात आता ती हँडलिंग सिस्टिमच्या असेंब्ली व प्रोसेसिंगसाठी 1000 चौ. मीटरच्या अतिरिक्त युनिटची भर घालत आहे. हे नवे केंद्र भोसरी एमआयडीसीतील सध्याच्या कारखान्यापासून सुमारे 150 मीटर दूर आहे.

या नव्या कारखान्यामुळे सर्वोत्तम दर्जाच्या जर्मन आणि एर्गोनॉमिक सोल्यूशन्स भारतीय बाजारपेठेत सादर करण्याबद्दल श्माल्झची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आहे.(Pune News) तेही संपूर्ण भारतात पसरलेल्या मजबूत सेवा आधारासह. पुढील दोन वर्षांत 100 करोड रुपयांची उलाढाल करण्याची कंपनीची योजना आहे जेणेकरून सध्याची उलाढाल दुप्पट होईल व्हॅक्यूम ऑटोमेशनच्या क्षेत्रात कंपनीचा बाजारपेठेतील वाटा 35 टक्के असून हँडलिंग सिस्टिमच्या एकूण 150 कोटी रुपयांच्या बाजारपेठेत तिचा वाटा 50 टक्के पेक्षा जास्त आहे.

Pune Crime : बंडगार्डन परिसरातील बार व क्लबवर पोलिसांचा छापा

हा नवीन कारखाना ही हँडलिंग सिस्टमसाठी पुढचे पाऊल असून कंपनी ते भारतीय ग्राहकांना पुरविण्यासाठी जर्मनीतून आयात करते. ही उत्पादने आता असेंब्ल करण्यात येतील आणि काही भाग हे स्थानीय पातळीवरही केले जातील. ते त्यांच्या जर्मन पुरवठ्याप्रमाणेच असतील त्यामुळे दर्जाचे प्रमाण हे कायम राखले जाईल. हा कारखाना 15 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह उभारण्यात आला आहे. या कारखान्याची सुरुवातीची क्षमता 35 टक्के असेल ती सध्याच्या व्यवसायाची पूर्ती करेल. तिच्यात 65 टक्के वाढीची क्षमता असून ती उलाढाल दुप्पट करण्यासाठी उपयोगात येईल.

येत्या काळात कंपनी भारतात स्थानिक पातळीवर केलेले व्हॅक्यूम हँडलिंग सिस्टिम्स उपलब्ध करून देईल. याशिवाय आपल्या “बिनार” या नवीन ब्रँडसह ताजी उत्पादने भारतीय बाजारपेठेत सादर करण्याचीही त्यांची योजना आहे. जम्बो, व्हॅक्यूमास्टर, बिनार निओ 30, बिनार क्विकलिफ्ट आणि बिनार क्यूएलआर रेंज ही उत्पादने सादर करण्यात येतील.

उत्पादनांच्या श्रेणीमध्ये व्हॅक्यूम हँडलिंग सिस्टिम्स आणि व्हॅक्यूम ऑटोमेशन उपलब्ध असतील. यात जम्बो, व्हॅक्यूमास्टर, बिनार निओ 30, क्विकलिफ्ट आणि क्यूएलआर (Pune News) हे व्हॅक्यूम हँडलिंग सिस्टिम्स असतील. व्हॅक्यूम ऑटोमेशनमध्ये व्हॅक्यूम पिक आणि प्लेस प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी ते संपूर्ण ग्रिपर्स आणि सुटे भाग उपलब्ध करून देतील. यात व्हॅक्यूम जनरेटर्स, फिल्टर्स, कनेक्टर्स, व्हॅक्यूम कप्स आणि व्हॅक्यूम सेन्सर्स यांचा वापर केलेला असेल.

यावेळी जे. श्माल्झ, जीएमबीएचचे व्यवस्थापकीय संचालक . अँद्रियास ब्यूटेल म्हणाले, “हा मैलाचा दगड गाठल्याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे आणि भारतीय बाजारपेठेत सर्वोत्तम सेवा व उत्पादने आम्ही देऊ याचा आम्हाला विश्वास आहे. भारत आणि विशेषतः पुणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे रणनीतिक स्थान आहे. भविष्यात आणखी गुंतवणूक करून स्थानिक युवकांसाठी अधिक रोजगार निर्माण करण्याचे आम्ही आश्वासन देतो. आम्ही एकूण 100 जणांना रोजगार दिला असून निकट भविष्यात ही संख्या 200 होऊ शकते.”

श्माल्झ इंडिया प्रा. लिमिटेडचे संचालक फिलिप जे. मणी म्हणाले, “या नव्या घडामोडीने आम्ही निश्चितच उत्साही आहोत. भारतात अधिक चांगला आणि दर्जेदार व्यवसाय करण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सक्शन कप्सचे 2003 पासून स्थानिकीकरण करून आम्ही पॅकेजिंग, प्लास्टिक्स आणि स्वयंचलन उद्योगाला आधीच मदत केली आहे. आता हँडलिंग सिस्टिम्सना सेवा देऊ शकणाऱ्या या नवीन कारखान्यामुळे आमचे लक्ष आता खाद्य, औषधी, साधनसामुग्री, टायर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाकडे लागले आहे.(Pune News) आम्ही एका नव्या पातळीला पोचलो आहोत आणि ही आमच्यासाठी खरोखर अत्यंत अभिमानाची बाब आहे. अनेक वर्षांपासून सातत्याने केली जाणारी गुंतवणूक हे सिद्ध करते की आम्ही येथे राहणार आहोत. आम्ही भारतीय ग्राहकांना हमी देतो, की त्यांना दीर्घकाळापर्यंत दर्जेदार उत्पादने आणि सेवा मिळत राहतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.