Pune School : मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ 13 अनधिकृत शाळा बंद

एमपीसी न्यूज : राज्य सरकारची परवानगी न घेता राज्यात (Pune School) काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. घटनेनंतर खरंतर राज्याच्या शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता राज्य सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या 13 अनधिकृत शाळा बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. 

कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता पुणे जिल्ह्यात 13 शाळा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या 43 शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या. यातील काही शाळांना राज्य सरकारने दंड ठोटावला होता. तर या अनधिकृत शान विरोधात गुन्हे दाखल करावेत असे आदेशही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहे. दरम्यान अनधिकृतपणे सुरू असणाऱ्या या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जवळच्या अन्य शाळांमध्ये त्यांचे समायोजन केले जाणार असल्याचेही प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले.

Pune : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीचा पाठलाग अन् डेटवर जाण्याची ऑफर, पुढे काय घडलं वाचा…

या आहेत अनधिकृत शाळा (Pune School)

जिल्ह्यातील अनधिकृत शाळा

1) ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल (आंबेगाव बुद्रूक ता. हवेली)

2)पुणे इंटरनॅशनल स्कूल (आष्टापूर मळा, लोणी काळभोर, ता. हवेली)

3) श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (वीर ता. पुरंदर- परस्पर स्थलांतर)

4) संकल्प व्हॅली स्कूल (उरवडे ता. मुळशी)

5) एसएनबीपी टेक्नो स्कूल (बावधन ता. मुळशी)

6)राहुल इंटरनॅशनल स्कूल (हिंजवडी ता. मुळशी)

7) अंकुर इंग्लिश स्कूल (जांभे/ सांगावडे ता. मुळशी)

8)श्री साई बालाजी पब्लिक स्कूल (दत्तवाडी नेरे, ता. मुळशी)

9) श्री. मंगेश इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल (अशोकनगर, लिंगाळी रोड, ता. दौंड- परस्पर स्थलांतर)

10) क्रेयॉन्स इंग्लिश स्कूल (कासुर्डी ता. दौंड)

11) किडझी स्कूल (शालिमार चौक, दौंड)

12)  सुलोचनाताई झेंडे बालविकास व प्राथमिक विद्यालय (कुंजीरवाडी)

13) तक्षशिला विक्रमशिला इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल(किरकीटवाडी)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.