Pune : क्रिएटिव्ह फाऊंडेशन व वैकुंठ परिवारातर्फे पोलिसांना सुरक्षा साधनांचे वाटप

एमपीसी न्यूज – क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि वैकुंठ परिवाराच्या वतीने फेस शील्ड, मास्क प्रदान पुणे – कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि वैकुंठ परिवाराच्या वतीने दीडशे फेस शील्ड आणि मास्क नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांना नुकतेच सुपूर्द करण्यात आले.

पोलीस खात्याच्या परिमंडळ तीनमध्ये फेस शील्ड, मास्क याची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यावर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि वैकुंठ परिवाराचे प्रशांत मोघे गुरुजी आणि सुभाष खांडेकर गुरुजी यांना दीडशे फेस शील्ड आणि मास्क त्वरीत उपलब्ध करून दिले. या साहित्याचा उपयोग विशेष पोलीस अधिकाऱ्यांसाठी करणार असल्याचे उपायुक्त गायकवाड यांनी सांगितले.

मोघे गुरुजी आणि खांडेकर गुरुजी यांनी अकरा हजार रुपयांचा निधी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना सुपूर्द केला. सध्याच्या साथीच्या काळात प्राणांची पर्वा न करता काम करणाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने पुरविण्याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.