Pune : भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज : वडगावशेरी येथील ब्रम्हा सनसिटी येथील (Pune) रहिवासी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने सुरक्षेसाठी झगडत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आक्रमक कुत्रे आणि कुत्रे चावण्याच्या अनेक तक्रारी पुणे महानगरपालिकेकडे करण्यात आल्या आहेत, परंतु त्यावर कोणतीही हालचाल महापालिकेकडून करण्यात आली नाही.

नुकत्याच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने फेब्रुवारीमध्ये एका लहान मुलावर झालेल्या हल्ल्यानंतर काढून टाकलेले कुत्रे परत घेण्यास सोसायटीला भाग पाडल्याने रहिवाशांना असहाय्य वाटत आहे.

शनिवारी रहिवाशांनी मूकमोर्चा काढून शांततेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात भाजप पुणे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सहभाग घेऊन नागरिकांना संबोधित केले. त्यांनी नमूद केले की 60 कुत्र्यांच्या परत येण्याने रहिवाशांची सुरक्षा धोक्यात आली असून विविध सरकारी अधिकाऱ्यांना समस्या समजावून सांगण्यासाठी ते रहिवाशांच्या सोबत आहेत.

भटक्या कुत्र्यांमुळे रहिवाशांना अनेक (Pune) समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कुत्र्यांना सोडण्यासाठी प्राणीप्रेमीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती आणि मानव-प्राणी संघर्ष सोडवण्यासाठी SPCA ला प्राणी कल्याण समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानुसार पुढे या कुत्र्यांना सोडण्यात आले, परंतु यामुळे सोसायटीतील लोकांची सुरक्षा अद्यापही अनुत्तरित आहे.

Today’s Horoscope 30 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.