Pune News : वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा 50 दिवसाचा काउन्ट डाऊन आज सुरु होणार

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने 84 व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या काउन्ट डाऊन 50 आज पासून सुरु होणार आहे. मंगळवार दिनांक 3 जानेवारी रोजी शिवाजीनगरमधील (Pune News) पीडीएमबीए स्पोर्टस काॅम्प्लेक्स येथे सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप उपस्थित राहणार आहे. अशी माहिती पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातु यांनी दिली.

यावेळी कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत  पाटील, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरीष बोरालकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह, पी   डीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Pimpri News: माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी यांच्यासह 100 हून अधिक कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

रणजीत नातु म्हणाले, 1997 मध्ये ही स्पर्धा पुण्यात झाली होती. त्या नंतर 25 वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स, थॉमस चषक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पदक विजेते भारतीय संघ सदस्य स्पर्धेत घेणे अपेक्षित आहे. यामुळे स्पर्धेची उंची वाढेल. (Pune News) पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, लक्ष्य सेन, सात्विक साईराज, चिराग शेट्टी, एच.एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, यासह अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवणार आहेत. पीडीएमबीए यंदा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पीडीएमबीए ला 2021 मध्ये 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.