Pune : 12 व्या महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शशिकांत कांबळे; खानवडीत २७ नोव्हेंबरला संमेलनाचे आयोजन

राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव यांची माहिती; संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. एस. डी.नाईक

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने खानवडी (ता.पुरंदर) येथे होणा-या १२ व्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शशिकांत कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. तर, डॉ. एस. डी.नाईक हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत, अशी माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव यांनी दिली आहे.

शशिकांत कांबळे हे सामाजिक चळवळीत गेली वीस वर्षे काम करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे ते अध्यक्ष आहेत.

यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, जिल्हाध्यक्ष राजा जगताप, तालुकाध्यक्ष शामराम मेमाणे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्ता भोंगळे, नंदकुमार दिवसे, चंद्रकांत टिळेकर आदी उपस्थित होते.

साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन व पुरस्कार वितरण समारंभ, परिसंवाद, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. डी.नाईक संमेलनाध्यक्ष पद भूषविणार आहेत. संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत स्वागताध्यक्ष निवडण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.