Pune : शिवकालीन संस्कृतीचे फॅशन शोच्या माध्यमातून सादरीकरण

एमपीसी न्यूज- महाफॅशन फाउंडेशन आणि तष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी रोजी बाणेर येथील वृंदावन लॉन्स येथे सायंकाळी साडेसात वाजता “शिवजातस्य” फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीचे निमित्त साधून शिवाजी महाराजांच्या काळातील पोशाख, अलंकार, पगडी तसेच इतर सामुग्री फॅशन शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमामधून करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक आणि तष्ट या संस्थेचे दीपक माने, नितीन अगरवाल, क्रियेटिव डिरेक्टर रवींद्र पवार आणि महाफॅशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत गुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माने यांनी शिवकालीन संकल्पनेबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आतापर्यंत फॅशन शो च्या माध्यमातून अनेक संकल्पनांवर आधारित विविध प्रांतांच्या पोशाखांचे सादरीकरण करण्यात आले आहे परंतु शिवकालीन साम्राज्यातील पेहेराव पहिल्यांदाच “शिवजातस्य” या फॅशन शो मधून दाखवण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी लंडन फॅशन वीकमध्ये हा कार्यक्रम सादर केला गेला होता. या अनोख्या फॅशन शो ची संकल्पना लक्ष्मीकांत गुंड यांची असून पुण्यातील तष्ट संस्थेतर्फे अतिशय कल्पकतेने तयार केलेली वस्त्र प्रावरणे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. फॅशन शो चे दिग्दर्शन प्रख्यात फॅशन शो कोरिओग्राफर सत्यजित जोगळेकर यांचे असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.