Pune : दत्तजयंती निमीत्त गोगवले मठात श्री गुरुचरित्र पारायण संपन्न

एमपीसी न्यूज – दत्तजयंती निमित्त (Pune) पुण्यातील मंगळवार पेठेत गोगावले यांच्या श्री स्वामी समर्थ मठात श्री गुरुचरित्र पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहाने संपन्न झाला.

हे पारायण 1 ते 7 डिसेंबर 2022 या सप्ताहात आदरणीय गोगावले काका लिखित मराठी श्री गुरुचरित्र याचे पारायण केले गेले. यात 300 स्वामी भक्त सहभागी झाले होते. मठातर्फे पारायण करणाऱ्यांना दररोज चहा व प्रसाद दिला गेला. तर, बुधवार दिनांक 7 रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात श्री दत्त जन्म व पालखी सोहोळा झाला.

या कार्यक्रमासाठी मठांत श्री स्वामी समर्थांना विविध फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. सर्वांना सुंठवडा व अन्य प्रसाद वाटप केले गेले. श्री गुरुचरित्र पारायणाचे हे 20 वे वर्ष होते. यावेळी सायंकाळी दर्शनासाठी भक्तांची खूप गर्दी होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.