New Sangavi : गुजरातमधील विजयाबद्दल नवी सांगवीत पेढे वाटून आनंद साजरा

एमपीसी न्यूज – गुजरात विधानसभा निवडणुकीत (New Sangavi) भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवीतील कृष्णा चौकात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवीतील कृष्णा चौकात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजपचा विजय साजरा केला. भाजपच्या ऐतिहासिक यशाबद्दल नागरिकांना पेढे वाटण्यात आले.

Pune : दत्तजयंती निमीत्त गोगवले मठात श्री गुरुचरित्र पारायण संपन्न

या आनंदोत्सवात भाजपचे प्रभाग क्रमांक 31 चे अध्यक्ष सखाराम रेडेकर, (New Sangavi) माजी नगरसेवक सागर अंघोळकर, बाळासाहेब देवकर, नवनाथ देवकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे, गणेश बनकर, सुनील कोकाटे, प्रवीण पाटील, राजेंद्र येडे, सचिन सोनवणे, चेतन तारू, साई कोंढरे, उमेश झरेकर, शुभम फरांदे, अमित घोडसाळ, आदित्य मस्के, मनीष रेडेकर, अरुण गळदगे, भालचंद्र तरटे, अशोक बनकर, नरसिंह पाटील, शामराव पताडे, नामदेव भाकरे, एम. पी. चौगुले, जे. डी. पाटील, गणेश जुनवणे, प्रवीण जगताप, मदन तांदळे, राजेश शिंत्रे, प्रेमानंद रेडेकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.