Pune : प्रत्येक महिलेने आर्थिक साक्षर झाले पाहिजे – मेधा कुलकर्णी

एमपीसी न्यूज – उत्कृष्ट कर्तुत्ववान उद्योजक महिलांच्या (Pune) कामाची जाणीव ठेवून दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम केला त्याबद्दल चेंबरचे आभार मानते. या कर्तुत्वान महिलांचे अभिनंदन करते व त्यांना व्यवसायवृध्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. हा कार्यक्रम देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेप्रमाणे आहे, असे नमुद केले. घराबाहेर जावून आपले कर्तुत्व सिध्द केल्याने आपल्याला छान वाटते. फक्त दागिण्यांनी महिला नटते असे नाही तर वेगवेगळे कौशल्य आत्मसात करुन कर्तुत्व सिध्द करुन महिलांनी नटले पाहिजे. व्यःतीमत्वाचे सौंदर्य हे ज्ञानाचे सौंदर्य असते. प्रत्येक महिलेने आर्थिक साक्षर झाले पाहिजे, असे राज्यसभेच्या नवनियुक्त खासदार प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

तसेच, आपण कमविलेल्या पैशांचे नियोजन कसे करायचे हेही बायकांनी समजून घ्यावे. दि पूना मर्चंटस् चेंबरला मनपूर्वक धन्यवाद दिले व सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून आपल्या कौटुंबिक व्यवसायामध्ये सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या कर्तुत्ववान महिलांना दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने ”व्यापार सरिता गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी खासदार डॉ. मेधा कुलकर्ण व स्वारगेट पोलीस स्टेशनच्या ए.सी.पी. नंदिनी वाग्यानी उपस्थित होत्या.

याप्रसंगी नंदिनी वाग्यानी यांनी सांगितले की, घरच्यांनी कौतुक करणे ही गोष्ट खूप मोठी आहे. महिला सक्षमीकरणाचा विचार करुन आमच्या पालकांनी आम्हाला घडविले. चेंबरचा कार्यक्रम म्हणजे घरचा कार्यक्रम आहे असं वाटते. कौटुंबिक (Pune) व्यवसायामध्ये सहभाग असणार्या महिलांचे कौतुक करण्याचे महत्वाचे काम चेंबर करत आहे व चेंबरचे हे काम खूप कौतुकास्पद आहे.

Nigdi : महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा सन्मान

या कार्यक्रमादरम्यान तरुलता त्रंबकलाल शहा (मे. श्रीरम आईल इंडस्ट्रीज), मीना शरदकुमार शहा (मे. रिलायबल ट्रेडर्स ), बसंती नारायण भट्टड, रेखा भट्टड (मे. रामेश्वर सेल्स डेपो), निलम प्रकाश शहा (महाराष्ट्र ­ टी सप्लाय), कुंदा तनेष शहा (मे. शा. उत्तमचंद भिकाचंद आणि कंपनी), अनिता अनिल शिंगवी (मे. सुप्रिम ट्रेडर्स ), लता अशोक शिंदे (मे. शिंदे आणि कंपनी), दिपा संजय गुगळे (मे. आकाश मार्केट), कविता विनोद गोयल (मे. न्यू सच्चा सौदा पेढी), उषा अशोक अग्रवाल (मे. गोयल ट्रेडिंग कंपनी), शितल संजय अग्रवाल (मे. सारा ट्रेडर्स), निता राजेश जाजू (मे. राजेश एंटरप्रायजेस), रुपल भावेश शहा (मे. शांतिलाल जी शहा -काजूवाला), मुनीरा शब्बीर चिकलीवाला (मे. शान टॉपीओका प्रोडक्टस्), कविता सुहास दोशी (मे. गोविंददास गोपीलाल दोशी), शिल्पा आशिष दुगड (मे. रिध्दी सिध्दी एंटरप्रायजेस), शर्मिला संपतराज जैन (मे. राजेश सेल्स), रश्मी अमित पुंगलिया व मंगला भिमराज बाठिया ( मे. आर. बी.ज् ड्रायफ्रुटस् ), निर्मला जगदीश पवार (मे. आईजी सेल्स्), प्रिया दर्शन शिंगवी (मे. विजयज् होलसेल), आरती अजित बोरा (ए.बी. इम्पेक्स), रिता परेश शहा (मे. परेश ट्रेडर्स), प्रियांका विजयराज राठोड (मे. श्री नशनल सेल्स कॉर्पोरेशन) अशा २५ कर्तुत्ववान महिलांचा “व्यापार सरिता गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.

चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी या महिलांच्या हाती आर्थिक दोरीचे कार्य आल्यामुळे संपूर्ण कुंटुंबाला आर्थिक सक्षम करीत आहेत, असे गौरवउद्गार काढले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष अजित बोरा, चेंबरचे सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, प्रविण चोरबेले, सुहास दोशी, दिनेश मेहता, उत्तम बाठिया, संदिप शहा , मुकेश छाजेड, मुकेश शहा, महिपालसिंह राजपुरोहित, हरिराम चौधरी, आशिष नहार, प्रकाश नहार, संकेत खिवंसरा, मनिष संचेती व चेंबरचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत ईश्वर नहार, पाहुण्यांचा परिचय सुहास दोशी व प्रविण चोरबेले यांनी करून दिला. आभार आशिष दुगड व सुत्रसंचालन सचिन रायसोनी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.