Kothrud : कोथरुडमधील खेळाडुंच्या कौशल्य विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – कोथरुडमधील खेळाडुंना (Kothrud) आपल्या कौशल्य विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने आयोजित नमो चषक 2024 चा पारितोषिक वितरण समारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय बॉडमिंटनपटू रेवती देवस्थळे, आंतरराष्ट्रीय हॉलिबॉलपटू दत्तात्रेय मोरे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा निवेदिता एकबोटे, शहराध्यक्ष करण मिसाळ, दुष्यंत मोहोळ, कोथरुड मंडल दक्षिचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, सरचिटणीस अनुराधा एडके, दीपक पवार, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, उदय कड, कुलदीप सावळेकर, प्रशांत हरसुले, सुशील मेंगडे, दीपक पोटे, बाळासाहेब टेमकर, प्रतिक खर्डेकर, किरण दगडे पाटील, यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार युवा मोर्चाने संपूर्ण राज्यात नमो चषकचे आयोजन केले होते. या स्पर्धेमुळे विविध क्रीडा प्रकारातील खेळाडुंना व्यासपीठ मिळाले. (Kothrud) अनेक नवोदित खेळाडूंनी याचा लाभ घेत; आपले उत्कृष्ट सादरीकरण करुन, आपल्या कौशल्याने सर्वांची मने जिंकली.

Pune : प्रत्येक महिलेने आर्थिक साक्षर झाले पाहिजे – मेधा कुलकर्णी

ते पुढे म्हणाले की, सामाजिक जीवनात काम करत असल्यापासून सातत्याने खेळाडुंना प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडुंनी आपल्या कौशल्याने देशाचा नावलौकिक वाढविला‌. कोथरुड मधील अशा नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्या खेळाडुंना क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवायचे आहे, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

शहराध्यक्ष करण मिसाळ म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार युवा मोर्चाने संपूर्ण राज्यात नमो चषकचे आयोजन केले. यामुळे अनेक खेळाडुंना प्रोत्साहन मिळाले. पुणे शहरातही सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. कोथरुड मध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या खंबीर पाठबळामुळे सर्वाधिक क्रीडा स्पर्धा झाल्या. यातून सर्वांनाच प्रेरणा मिळाली, असे गौरवोद्गार काढले.

यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रेवती देवस्थळे, आंतरराष्ट्रीय हॉलिबॉलपटू दत्तात्रेय मोरे यांनी देखील नमो चषकच्या आयोजनासाठी आयोजकांचे अभिनंदन करून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक डॉ. संदीप बुटाला यांनी केले, तर स्वागत कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.