Pune News : महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज: पुण्यातील हडपसर परिसरात एका महिलेच्या त्रासाला कंटाळून वीस वर्षीय तरुणानी आत्महत्या केली. या तरुणाने वैदुवाडी येथील कालव्यात उडी मारून जीवन संपवले. (Pune News) हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे. 

 

 

नयन नरेंद्र मोरे (वय 20, रा. हरकारनगर, भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जेबा सय्यद (वय 30) या महिलेला अटक केली आहे. तिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, नयन आणि आरोपी महिला भवानी पेठेत जवळपास राहण्यास आहेत. शुक्रवारी रात्री या दोघात कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर आरोपी महिलेने नयन याला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी नयन घरातून निघून गेला तो उशिरापर्यंत घरी परत आलाच नाही.(Pune News) त्यामुळे त्याच्या घरच्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

Pimpri : पाणी उकळून, गाळून प्या; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

 

 

 

दरम्यान हडपसर येथील वैदुवाडी कालव्यामध्ये सोमवारी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. चौकशीत हा मृतदेह नयन मोरे याचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी संबंधित महिलेविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.